Tirupati bank – “मदतीचा हात तिरूपतीची साथ”या उक्तीस जागणारी श्री तिरूपती नागरी सहकारी पतसंस्था संस्थेची वाटचाल व प्रगती

“madtIcaa hat it$ptIcaI saaqa”yaa ]@tIsa jaagaNaarI EaI it$ptI naagarI sahkarI ptsaMsqaa saMsqaocaI vaaTcaala va p`gatI

“मदतीचा हात, तिरुपतीची साथ” हे ब्रीदवाक्य घेऊन विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सन १९९९ मध्ये स्थापना करण्यात आलेली श्री तिरुपती नागरी सहकारी पतसंस्था पुणेकरांच्या विश्वासास अल्पावधीतच पात्र ठरली आहे व रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. परंपरिक पद्धतीने चालणाऱ्या पतसंस्थेच्या कार्यपद्धतीला छेद देत व सहकारी पतसंस्थांच्या पत नसलेल्यांना पत देणे या मूळ तत्त्वांशी प्रामाणिक राहून पतसंस्थेने आधुनिक कार्यपद्धतीचा अवलंब करून आपला वेगळा ठसा उमटवला आहे. सभासदांच्या सोयीसाठी संस्थेने कोअर बँकिंग प्रणालीचा अवलंब केलेला आहे. १० बाय २० खोलीत सुरू केलेल्या पतसंस्थेचा आता वटवृक्ष होत असून सात शाखा व स्वमालकीच्या सहा वास्तूंमधून संस्थेचे कामकाज सुरू असून संस्थेच्या स्वमालकीच्या वास्तूंची आजची किंमत जवळजवळ सहा कोटी एवढी आहे. संस्थेच्या स्थापनेच्या वेळी कार्यक्षेत्र हे वॉर्डपुरतेच मर्यादित होते. त्यानंतर संस्थेचा विस्तार वाढत असता संस्थेचे कार्यक्षेत्र पुणे जिल्हा करण्यात आले. ३१ मार्च २०२४ अखेर संस्थेची सांपत्तिक स्थिती भाग भांडवल ३ कोटी ४३ लाख, ठेवी १३७ कोटी ६० लाख, कर्जे ९८ कोटी ११ लाख, खेळते भांडवल १६५ कोटी ४६ लाख तर गुंतवणूक ४८ कोटी ५४ लाख एवढे आहे. संस्थेच्या सात शाखा रविवार पेठ, बिबवेवाडी, धनकवडी, कर्वे रोड, हडपसर, वडगाव शेरी व सांगवी येथे आहेत. संस्थेने धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, जय गणेश नागरी सहकारी पतसंस्था, सुभाष नागरी सहकारी पतसंस्था व धनकुबेर नागरी सहकारी पतसंस्था या चार पतसंस्थांचे यशस्वीपणे विलीनीकरण करून घेतले आहे व त्यामुळे या पतसंस्थेच्या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग “अ”, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आयएसओ 9001 : 2015 या मानांकनाने मान्यताप्राप्त पतसंस्था, संपूर्णपणे संगणकीकृत कामकाज, पुणे जिल्हा कार्यक्षेत्र, सुसज्ज लॉकर सुविधा, १० वीच्या माध्यमिक परीक्षेत पुणे जिल्ह्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांसाठी श्री तिरुपती पुरस्कार, अल्पावधीतच स्वमालकीच्या सहा वास्तू, आकर्षक व्याजदर व सुलभ कर्जपुरवठा, विनम्र व तत्पर सेवा, सोनेतारण कर्ज सुविधा, शैक्षणिक कर्ज सुविधा, प्रभावी थकबाकी नियोजन, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, स्थापनेपासूनच भरघोस लाभांश व इतर सुविधा सुरू केलेल्या आहेत. ही संस्थेची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत.
आजपर्यंत संस्थेने ४००० पेक्षा जास्त रिक्षाचालकांना रिक्षासाठी कर्ज देऊन त्यांना स्वबळावर उभे राहण्यासाठी मदत केलेली आहे. तसेच महिला सबलीकरणासाठी “श्री तिरुपती स्वयंंसिद्धा लघुकर्ज योजना” ही कर्ज योजना महिला बचत गटांसाठी सुरू केलेली आहे.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचित्य साधून सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्थांचा गौरव करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतला होता व पुणे विभागातून सर्वोत्तम सहकारी संस्थेसाठी दिल्या जाणाऱ्या “सहकारभूषण” पुरस्काराने मा. राज्यपाल के. शंकरनारायणन व मा. मुख्यमंत्री मा. श्री पृथ्वीराजजी चव्हाण यांच्या हस्ते दिनांक २.१२.२०१२ रोजी गौरविण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप ५१,०००/- रुपये व स्मृतिचिन्ह असे होते.
तसेच स्वर्गीय राजीव गांधी एक्सलन्सी अवॉर्ड, राष्ट्रीय सहकार गौरव पुरस्कार, बँकिंग इमेज ऑफ इंडिया पुरस्कार, राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार, विघ्नहर्ता पुरस्कार, श्री समय सहकार पुरस्कार, राष्ट्रीय समाज गौरव पुरस्कार, आदर्श समाज भूषण पुरस्कार, सहकार श्रेष्ठ पुरस्कार २०१६, राष्ट्रीय विकास रत्न पुरस्कार, बँको पतसंस्था पुरस्कार, दीपस्तंभ पुरस्कार हे सहकार क्षेत्रातील कामगिरीबद्दल संस्थेला मिळालेले आहेत.
संस्थेची भविष्यात संस्था ही ० टक्के एनपीए व संस्थेचा एकत्रित व्यवसाय २५० कोटी करण्याचा व येत्या आर्थिक वर्षात नवीन शाखा उघडण्याचा संस्थेचा मानस असून संस्थेच्या त्या दृष्टीने वाटचाल चालू आहे.
संस्थेचे स्फूर्तिस्थान कै. रामगोपालजी पुंगलिया असून संस्थापक अध्यक्ष श्री जुगलकिशोर पुंगलिया हे आहेत. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री संतोष चोपडा हे असून उपाध्यक्ष श्री विनोद जाजू हे आहेत तर महाव्यवस्थापक म्हणून श्री उमेश वाघे हे काम पाहत आहेत.

Deposite

LOAN

LOCKER

आकर्षक कर्ज योजना

संस्थेची ठळक वैशिष्टे
ऑडिट वर्ग सतत “अ”
तत्पर, विनम्र व स्नेहपूर्ण सेवा
समान मासिक हप्त्याची सुविधा
सुरक्षितता व विश्वासाहर्ता
सुलभ कर्ज पुरवठा
आकर्षक कर्ज योजना
संपुर्णपणे संगणकीकृत सेवा
डी. डी. ची सुविधा उपलब्ध
पुणे जिल्हा कार्यक्षेत्र
सोने तारण कर्ज उलब्ध
आकर्षक ठेव व्याजदर
लॉकर सुविधा उपलब्ध

विश्वस्त व सहकारी संस्थांच्या ठेवी स्वीकारण्याची सहकार खात्याकडून परवानगी

Sanstha Pragati Aalekh ( Growth Pichart )

Awards & Recognition

Scroll to Top